- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली येथे सुरु असलेल्या सत्र २०२४-२५ च्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा संमेलनात देसाईगंज येथील आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्ष वयोगटाच्या मुलींच्या खो-खो संघाने गडचिरोली जिल्हात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
महाविद्यालयाचा हा संघ आता नागपूर विभागस्तरीय शालेय क्रीडा संमेलनामध्ये गडचिरोली जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहे.तालुकास्तरावर सुद्धा विविध मैदानी खेळात उत्कृष्ट अशी कामगिरी करीत विद्यालयाने तालुक्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. विद्यालयाचे एकूण सहा संघ जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत.खो-खो संघाच्या यशाबद्दल आज महाविद्यालयामध्ये खेळाडूंचे तसेच प्रशिक्षक मंगेश गुरफुले,मिलिंद उईके,कु.पल्लवी रामटेके यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमास नूतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंजचे उपाध्यक्ष जगदीश शर्मा,जहीर शेख,संतुमल डोडाणी,महाविद्यालयाचे प्राचार्य डी.डी. शिंगाडे, उपमुख्याध्यापिका एस.पी.प्रधान,पर्यवेक्षिका डी.व्ही.चव्हाण यांचे हस्ते खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे पुष्पगुच्छ आणि पेढे भरवून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेशीम गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.पंकज धोटे यांनी मानले.
- Advertisement -

