उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत.लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर करण्यात आली आहे.यानंतर महिलांना अर्ज दाखल करता येणार नाहीत.या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार आहेत.जुलै २०२४ पासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात याची घोषणा केली होती.दरवर्षी योजनेसाठी ४६ हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे.महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत.ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे; अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन अर्जदार महिलांच्या बँक खात्यावर एकत्रितरित्या जमा झाले.३१ जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या २ महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी ३ हजार रुपये खात्यात वर्ग करण्यात आले.यानंतर या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. आता ३० सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे हे मानधन आहे.
त्वरा करा..! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज ‘या’ तारखे पर्यंतच भरता येणार.. – ज्यांना एकही रक्कम मिळाली नाही; अशांना मिळणार ४५०० रुपये..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

