Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीगैरमार्गाने संपत्ती गोळा केल्याप्रकरणी देसाईगंजचे तत्कालीन वनपरिक्षेत्राधिकारी कोरेवार यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल..

गैरमार्गाने संपत्ती गोळा केल्याप्रकरणी देसाईगंजचे तत्कालीन वनपरिक्षेत्राधिकारी कोरेवार यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मिळणारे वेतन कमी आणि संपत्ती जास्त हेही घातकच असते; याची हल्ली प्रचिती दिसून आली आहे.एकेकाळी गडचिरोली जिल्ह्याच्या वन विभागातील वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वनाधिकाऱ्याची
बदली फिरत्या वनपरिक्षेत्रात झाली अन् होत्याचे नव्हते झाले.गैरमार्गाने ६६ लाख रुपयांची संपत्ती गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसाईगंज(वडसा)येथील फिरत्या वनपरिक्षेत्राचे तत्कालिन वनपरिक्षेत्राधिकारी दिवाकर रामभाऊ कोरेवार यांच्यावर अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे.कोरेवार हे सध्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पाली वनआगाराचे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
२०२० मध्ये दिवाकर कोरेवार व त्याच्या अधिनस्थ महिला कर्मचाऱ्यांवर १ लाख ७५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कोरची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.तेव्हापासून कोरेवारची चौकशी सुरु होती. त्याअनुषंगाने एसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड यांना चौकशीदरम्यान दिवाकर कोरेवार याच्याकडे ज्ञात व कायदेशीर उत्पन्नापेक्षा ६६ लाख ८ हजार ४०४ रुपये अधिक आढळून आले.ही अपसंपदा ८३.०३ टक्क्यांनी अधिक आहे.यामुळे अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी दिवाकर कोरेवार आणि ही अपसंपदा संपादित करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे त्याच्या पत्नीवर गडचिरोली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर आज,शुक्रवारी २० सप्टेंबरला कोरेवार याच्या गडचिरोली शहरातील रामनगर येथील घराची झडती घेण्यात आली.शिवाय पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने कोरेवार सध्या राहत असलेल्या वाडा येथील निवासस्थानाचीही झडती घेतली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!