Tuesday, August 11, 2026
Homeएटापल्लीपाय घरसला अन् विहिरीत पडला.. - १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू...

पाय घरसला अन् विहिरीत पडला.. – १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
एटापल्ली(गडचिरोली):-आईवडिलांसोबत शेतात कामासाठी गेलेला मुलगा हातपाय धुण्यासाठी विहिरीवर गेला व पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्युमुखी पडला.ही घटना १५ ऑगस्ट रोजी एटापल्ली तालुक्यातील डुम्मे गावात घडली.निखिल सदाशिव दुर्वा वय १७ वर्षे असे मृत मुलाचे नाव आहे.तो दहावी उत्तीर्ण आहे.डुम्मे गावात आईवडील व भावासमवेत तो राहायचा.१५ ऑगस्टला स्वतःच्या शेतात धान रोवणीचे काम सुरू होते.त्यासाठी तो गेला होता.दुपारी २ वाजता जेवणाची वेळ झाली.हातपाय धुण्यासाठी निखिल हा विहिरीवर गेला,यावेळी पाय घसरून तो विहिरीत पडला.पोहता येत नसल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा मृत्यू झाला. बराचवेळ होऊनही निखिल न आल्याने आई विहिरीजवळ गेली असता तिला त्याची चप्पल विहिरीजवळ दिसली.विहिरीत डोकावून पाहिले असता मुलगा पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने आईने टाहो फोडीत आरडाओरड केली व सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!