Saturday, July 25, 2026
Homeगडचिरोलीचक्क उपसरपंचाने केली सरपंचाची उचलबांगडी..-सरपंचपद व सदस्यत्वही झाले रद्द…

चक्क उपसरपंचाने केली सरपंचाची उचलबांगडी..-सरपंचपद व सदस्यत्वही झाले रद्द…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यात अनोखा व आगळा वेगळा प्रकार एका ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे.चक्क उपसरपंचाने सरपंचाची उचलबांगडी केल्याने ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला सरपंचपद व सदस्यत्वही गमवावे लागले आहे.

चामोर्शी तालुक्यातील चाकलपेठ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचा गीता विकास रायसिडाम यांनी पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ४ एप्रिल २०२४ चा चौकशी अहवाल आदेश कायम ठेवत नागपूर विभागाचे अप्पर आयुक्त यांनी सरपंचपद व सदस्यत्व रद्द केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की,चाकलपेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील जगन्नाथ रामगोनवार यांनी महिला सरपंचा गीता रायसिडाम ह्या ई-निविदा स्वतः पोर्टलवर अपलोड करूनही ई-निविदा न उघडणे,सन २०२०-२०२१ मध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाची स्वतःच्या चुलत सासऱ्याकडून तक्रार करवून पैसे व कमिशनची मागणी करणे व कंत्राटदाराची देयक अदा न करणे. देयक नस्तीवर स्वाक्षरी न करणे,पतीला व चुलत सासऱ्याला ग्रामपंचायतमध्ये बोलावणे,मासिक सभेतून फोन लावणे व त्यानंतर निर्णय घेणे आदी विविध प्रकारचे आरोप केले होते.यावर गैरअर्जदार सरपंच यांनी सदर आरोपाचे खंडन करत प्राथमिक आक्षेप अर्ज दाखल केला होता.अर्जदार उपसरपंच सुनील रामगोनवार यांनी केलेले आरोप ग्राह्य धरत जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांचा ४ एप्रिल २०२४ चा चौकशी अहवाल मान्य करून गैरअर्जदार सरपंच गीता विकास रायसिडाम यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

तब्बल सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली बारावीची विद्यार्थिनी सापडली पतीसोबत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बारावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सहा महिन्यांपूर्वी घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.मात्र,मुलीची काहीच माहिती मिळत नसल्याने अखेर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मेधा भाले यांच्यावर कारवाईची मागणी.. – भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका ॲड.मेधा भाले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!