Friday, May 1, 2026
Homeनागपूरपुराच्या पाण्यातून ट्रक चालविणे पडले महागात..-दोघांनीही गमावला जीव…

पुराच्या पाण्यातून ट्रक चालविणे पडले महागात..-दोघांनीही गमावला जीव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-राज्यमार्गावरून वाहणाऱ्या नांद-चिखलापार नदीला आलेल्या पुरात ट्रकसह चालक व क्लीनर असे दोघे वाहून गेलेत.काल,रविवारी सायंकाळी ४:४० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.जीवनमृत्यूचा हा थरार तब्बल पाच मिनिटे चालला असून घटनेचा २ मिनीट १२ सेकंदांचा व्हिडीओसुद्धा आता समोर आला आहे.

गत २४ तासांपासून नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहतूक ठप्प आहे.अशातच सायंकाळी ४:४० वाजेच्या सुमारास उमरेडवरून हिंगणघाटकडे जात असलेला एक ट्रक नांद-चिखलापार नदीच्या पुलावरून वाहत गेला.यावेळी उपस्थित नागरिकांनी चालक व क्लीनर या दोघांनाही ट्रकसह पुराच्या पाण्यातून प्रवास करण्यास मज्जाव केला.मात्र, चालकाने त्याकडे दुर्लक्ष करीत,मार्गावरून वाहत असलेल्या पाण्यात ट्रक टाकला.बघता-बघता हा ट्रक काही अंतरावरच मार्ग सोडून पाण्याच्या प्रवाहात लागला. यावेळी सुद्धा नागरिकांनी चालक व क्लीनरला ट्रकमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले. त्यानंतरही चालक ट्रक चालवीत राहिला.दरम्यान पुलावर पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे ट्रकसह चालक व क्लीनर वाहून गेले.माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विद्यासागर चौहान, तहसीलदार कल्याणकुमार डहाट,ठाणेदार प्रमोद घोंगे, ठाणेदार अजीत कदम घटनास्थळी पोहोचले.माजी आ.सुधीर पारवे व माजी आ.राजू पारवे हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.

उपस्थित नागरिकांनी ट्रक चालकाला पुढे न जाण्याचा सल्ला दिला.मात्र,चालकाने कुणाचे काही ऐकले नाही. लागलीच एक मिनिटानंतर ट्रक पुराच्या पाण्यातून रस्ता सोडू लागला.पुढच्या १५ सेकंदांतच ट्रकने नदीपात्रात पलटी मारली.त्यानंतर पुन्हा सरळ होऊन ट्रकचा काही भाग पुलाला अडकून राहिला.नागरिक चालकाला ट्रकमधून बाहेर पडण्याचे आवाहन करीत होते.असा संपूर्ण २ मिनिटे १२ सेकंदांचा जीवनमृत्यूचा थरार मोबाइलमध्ये कैद झाला आहे.त्यानंतर चालक व क्लीनर केबिनमधून बाहेर पडत,ट्रकवर चढले.मात्र, तोपर्यंत ट्रक पाण्यात बुडायला लागला होता.त्यानंतर ट्रकसह चालक व क्लीनर वाहून जात असल्याचे दृश्य नागरिक बिघतले,वाहून गेलेल्या ट्रकसह चालक व क्लीनरचा यंत्रणेकडून शोध सुरू आहे.सदर ट्रकचा क्रमांक माहीत नसल्यामुळे हा ट्रक कुणाचा आहे.कुठे चालला होता.चालक व क्लीनरची नावे.याबाबत यंत्रणासुद्धा अनभिज्ञ आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!