Wednesday, August 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबँक कर्जदारांना मोठा दिलासा…बँका मनमानी करून खातेदारांना डिफॉल्टर ठरवू शकणार नाही….

बँक कर्जदारांना मोठा दिलासा…बँका मनमानी करून खातेदारांना डिफॉल्टर ठरवू शकणार नाही….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-रिझर्व्ह बँकेने नुकतेच कर्जादारांसंदर्भात बँकांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार कोणत्याही कर्जदाराला डिफॉल्टर श्रेणीत टाकण्यापूर्वी बँकेला त्या कर्जदारांची बाजू ऐकावी लागेल.बँकांना थकबाकीदारांना २१ दिवसांची नोटीस द्यावी लागेल. या नव्या निर्देशामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.

याआधी बँक कर्जदारांना वसुलीच्या नावावर नोटीस पाठवून त्यांना डिफॉल्टर म्हणून घोषित करायची.मात्र, आता बँका मनमानी पद्धतीने खातेदारांना डिफॉल्टर ठरवू शकत नाही.आरबीआयने सर्व बँका,सहकारी बँका,वित्तीय कंपन्यांना स्पष्ट केलेय की,कर्जदारांना आपली बाजू मांडण्यात वेळ द्या.त्यांना एकतर्फी डिफॉल्टर ठरवू नका.

आरबीआयच्या या निर्देशांचा बँकींग सेक्टरवर मोठा परिणाम होईल.त्यामुळे बँकांना त्यांचे इंटरनल ऑडिट सिस्टम मजबूत करावी लागेल.ते मनमानी करून कर्जदारांवर ॲक्शन घेऊ शकत नाही. बँकांना फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट बनवावे लागेल,ज्याला बोर्डाकडून मंजुरी घ्यावी लागेल.बँक आता फसवणुकीत सहभागी संस्था,प्रमोटर्स आणि डायरेक्टर्सला कारणेदाखवा नोटीस जारी करेल.नोटीस पाठवल्यानंतर उत्तर देण्यासाठी कमीत कमी२१ दिवसांचा वेळ द्यावा लागेल.एवढेच नव्हे तर कोणत्याही बँक खात्याला डिफॉल्टर घोषित करण्यापूर्वी विस्तृतपणे कारण सांगावे लागेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!