उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) राबविली जाते.यात मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान,शासनाच्या हमी भावाने मध खरेदी,विशेष प्रशिक्षणाच्या सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.यातील वैयक्तिक मधपाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा.स्वता:ची शेती असल्यास प्राधान्य,वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.तर केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजनेसाठी लाभार्थी वैयक्तिक स्वरुपाचा असावा,किमान १० वी उर्त्तीण असावा.२१ वर्षापेक्षा जास्त वय असावे.अशा व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेती भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन असावी.लाभार्थीकडे मधमाशापालन,प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक संस्था योजनेसाठी संस्था नोंदणीकृत असावी.संस्थेच्या नावे किंवा १० वर्षासाठी भाडेतत्वावर किमान १ एकर शेतजमीन असणे आवश्यक आहे.१ हजार चौरस फुट इमारत असावी. सदर योजनेचे प्रशिक्षण अर्ज करण्यासाठी मंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,जिल्हा उद्योग केंद्र भवन,कोटगल रोड, गडचिरोली येथे संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी मुलकलवार मधुक्षेत्रिक मो.क्रं. 9422628050 यांच्याशी संपर्क साधावा.तरी जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

