Monday, July 13, 2026
Homeनागपूरआता १ जुलै पासून होणार तीन कायद्यात बदल…-खून प्रकरणातील ३०२ ऐवजी १०३(१)…

आता १ जुलै पासून होणार तीन कायद्यात बदल…-खून प्रकरणातील ३०२ ऐवजी १०३(१)…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- खून प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल होतो; हे सामान्य नागरिकांनाही माहिती आहे.मात्र आता नवीन कायद्यांतर्गत भादंविच्या कलमांमध्ये बदल होणार आहे. उदाहरणार्थ,खून प्रकरणात आता भादंविच्या कलम ३०२ ऐवजी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. सामान्य भाषेत नागरिक लुटपाटची घटना घडली की, ३९२ झाला असे म्हणता.मात्र आता बीएनएसमध्ये ही कलम ३०९ असेल.

तीन नवीन फौजदारी कायदे- भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा, केंद्र सरकारने २५ डिसेंबर २०२३ रोजी अधिसूचित केले होते.आता १ जुलैपासून या ३ नवीन कायद्या अंतर्गतच गुन्हे नोंदविण्यात येतील.हे कायदे भारतीय दंड संहिता,दंड प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्याची जागा घेतील.आता हे तिन्ही नवीन कायदे स्वीकारणे सहज शक्य होणार नाही.कारण न्यायाधीश व वकिलांसोबतच न्यायालयीन कर्मचारी आणि पोलिस विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही हे कलम लक्षात ठेवावे लागेल.त्यानुसारच कोर्टात बाजू मांडावी लागेल. 

सर्व विधी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण 👇

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे (डीएलएसए) सचिव- न्यायाधीश सचिन एस.पाटील यांनी सांगितले की, १ जुलैपासून नवीन कायद्याच्या कलमांनुसार कामाला सुरुवात होईल.तिन्ही नवीन कायद्यांचे उद्दिष्ट न्याय प्रदान करणे आहे.हे फौजदारी प्रकरणात न्याय देण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत आणि दस्तऐवजांची व्याख्या लक्षणीयरीत्या विस्तारली आहे. याची माहिती सर्व विधी अधिकाऱ्यांना असली पाहिजे.डीएलएसएकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.न्यायाधीश,वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. यानंतर नागरिकांना नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.यासाठी ई-कोर्सचाही वापर केला जाऊ शकतो. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!