Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीआता ‘दामिनी’ मोबाईल ॲप देणार विज पडण्याची सूचना…-विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी देणार...

आता ‘दामिनी’ मोबाईल ॲप देणार विज पडण्याची सूचना…-विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी देणार सूचना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात  होतात.विज पडून जिवीत हानी होऊ नये; याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी ” ॲप तयार केले आहे.हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणार आहे.त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सदरचे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच शासकीय यंत्रणा,शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिक,क्षेत्रीय अधिकारी,मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच,पोलिस पाटील,तलाठी, ग्रामसेवक,कृषीसेवक,कोतवाल,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,आरोग्य सेवक,ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा व इतरांनाही दामिनी ॲप वापरण्यास प्रवृत्त करावे.

सदरचे ॲप जीपीएस लोकेशन ने काम करीत असून त्यात विज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी सूचना देण्यात येते.सदरच्या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे.तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सदर ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी; असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी केले आहे .

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!