Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्याला मिळाले १९ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी…

गडचिरोली जिल्ह्याला मिळाले १९ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.याबाबत नागरिकांची निकड लक्षात घेता पावसाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावे; याकरिता जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष विजय भाकरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह व समितीने शिघ्रतेने कार्यवाही करत दोन दिवसातच ८० कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखत घेवून लगेचच १९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. 

जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक असल्याने सदरची नियुक्ती प्रक्रिया तातडीने  राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिली.ग्रामीण भागात आरोग्य अधिकारी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह अनेक दिवसांपासून आग्रही होत्या. 

जिल्हा परिषद,गडचिरोली आरोग्य विभाग अतंर्गत सहा एम.बी.बी.एस.व १३ बी.ए.एम.एस अहर्ता धारक वैद्यकीय अधिक-यांच्या रिक्त पदाकरिता थेट मुलाखत दिनांक-१८ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडली.याकरिता वृत्तपत्रात जाहिरात तसेच एन.आय.सी.व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशीत करण्यात आलेली होती.या पदभरतीकरिता गडचिरेाली,गोदिया,चंद्रपुर, नागपुर,भंडारा, अमरावती व यवतमाळ या जिह्यातील  एम.बी.बी.एस.व बी.ए.एम.एस.शैक्षणीक अहर्ता  धारक उमेदवार उपस्थीत होते.विशेष म्हणजे १९ जागांकरिता ८० अर्ज प्राप्त झाले होते.जिल्ह्यात आरोग्य सेवेत काम करण्यासाठी प्रथमच चांगला प्रतिसाद मिळाला.

या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळाले नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी👇

येनाापूर,कारवाफा,पेंढरी,अडपल्ली,कसनसुर,रांगी, सावंगी,वैरागड, देउळगाव,आमगाव,गट्टा,झिंगानूर, रंगय्यापल्ली,कमलापूर,कसनसुर,आरेवाडा,अंगारा, लगाम व फिरते आरोग्य पथक कोरची या १९ प्राथमिक आरोग्य केंद्रावर नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सात दिवसात रूजू व्हावे; अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द करून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल,अशा सूचना नियुक्ती आदेशात देण्यात आल्या असल्याचे जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!