Saturday, October 17, 2026
Homeगडचिरोलीचारधाम यात्रेसाठी भाविकांनी ऑनलाईन नोंदणी करुनच प्रवास करावा- गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने

चारधाम यात्रेसाठी भाविकांनी ऑनलाईन नोंदणी करुनच प्रवास करावा- गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- चारधाम यात्रेसाठी संपूर्ण भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात उत्तराखंड येथे जात असल्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर ताण पडत आहे.भाविकांना सुलभ व सहजपणे यात्रा पूर्ण करता यावी; यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय चारधाम यात्रेचे नियोजन करु नये; असे आवाहन उत्तराखंड राज्याच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी केले आहे. 

चारधाम यात्रेतील दर्शनाचे प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच भाविकांना ऑनलाईन नोंदणीनुसार सहज दर्शन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्तराखंड प्रशासनाने  https://registrationandtouristcare.uk.gov.in संकेतस्थळ सुरु केली आहे.ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे. 

जेष्ठ नागरीक तसेच वैद्यकीय उपचार घेत असलेल्या नागरिकांना यात्रा सुरु करण्यापूर्वीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधित उत्तराखंडच्या सार्वजनिक आरोग्य  व कुटूंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्या https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

चारधाम यात्रेसाठी नियोजन केलेल्या जिल्ह्यातील सर्व भाविकांनी ऑनलाईन नोंदणी करुनच प्रवास करावा तसेच यात्रेदरम्यान होणारी गैरसोय व गर्दी टाळावी; असे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.  

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!