Saturday, June 20, 2026
Homeबल्लारशाह२२ वर्षीय तरुणाने नऊ वर्षीय मुलासोबत केले अनैसर्गिक कृत्य…-तरुणास केली अटक…

२२ वर्षीय तरुणाने नऊ वर्षीय मुलासोबत केले अनैसर्गिक कृत्य…-तरुणास केली अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बल्लारपूर (चंद्रपूर):- बल्लारपूर शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.शहरातील एका नऊ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना रविवारी  (दि. २१) उघडकीस आली.या प्रकरणी २२ वर्षीय विकृत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

प्राप्त माहितीनुसार नऊ वर्षीय मुलगा कुटुंबासह शहरातील एका वॉर्डात राहतो.आठ दिवसापूर्वी त्याच्या घराजवळ राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने घराजवळील झुडपात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले.रविवारी त्या बालकाची आई पाणी भरीत असताना तिने घराजवळील लहान मुलांचे कुजबुज ऐकले.तिने घरी येऊन आपल्या मुलास विचारले असता त्याने २२ वर्षीय तरुणाने अनैसर्गिक कृत्य केल्याचे सांगितले.आई ने लगेच ही बाब त्याच्या वडिलांना सांगितली आणि त्या मुलाचे आई-वडील तसेच परिसरातील महिलांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.पोलिसांनी कारवाई करत २२ वर्षीय तरुणाला अटक केली.त्याच्यावर भादंवि कलम ३७७,३६३,५०६, पोस्को ४,८ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलिस करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!