Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबस आणि ट्रकचा भीषण अपघात; ९ जण जखमी तर ४ प्रवाशांचा मृत्यू…..

बस आणि ट्रकचा भीषण अपघात; ९ जण जखमी तर ४ प्रवाशांचा मृत्यू…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- मुंबई-आग्रा महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे.या मार्गावरील चांदवडमधील राहुड घाटामध्ये एका एसटी बसचा गंभीर अपघात झाला असून या अपघातात 4 प्रवासी दगावल्याची प्राथमिक माहिती समोर पाआली आहे.सकाळी साडेनऊच्या सुमारास जळगावहून ते वसईला जाणाऱ्या एसटी बसला हा अपघात झाला. या अपघातामध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा मार्गावर हा अपघात घडला.भरधाव वेगात असलेल्या एसटीला एका ट्रकने डाव्या बाजूने धडक दिली.राहुड घाट परिसरामध्ये हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४५ प्रवासी होते.बसच्या पुढील बाजूला डावीकडे ट्रकने जोरदार धडक दिली. सारे काही इतक्या वेगाने घडले की प्रवाशांना सावरण्यासाठीही वेळ मिळाला नाही.बसवरील ताबा सुटल्यानंतर अनेकजण बाहेर फेकले गेले किंवा बसच्या खिडक्यांवर आदळले.प्राथमिक माहितीनुसार या अपघातात ४ प्रवासी दगावले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या इतर वाहनांमधील प्रवाशांनी थांबून अपघातग्रस्त एसटी बसमधील प्रवाशांना बाहेर काढले.अनेक प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे धक्कादायक चित्र या अपघातानंतर रस्त्यावर दिसत होते.या मार्गावरुन जाणाऱ्या इतर प्रवाशांपैकी काहींनी पुढाकार घेऊन अपघातग्रस्त बसच्या सांगाड्यावर चढून अडकलेल्या प्रवाशांना एक-एक करुन बाहेर काढले.मतदकार्य पोहचण्याआधीच या प्रवाशांनी केलेल्या मदतीमुळे बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढता आले. अपघातानंतर बस डिव्हाडरला आदळून थांबल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरुन स्पष्ट होत आहे.या अपघातात जखमी झालेल्या १७ प्रवाशांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!