Saturday, September 26, 2026
Homeउत्तरप्रदेशनको त्या अवस्थेत आईला बघून ; 'मी पप्पांना सांगणार'..! चिमुरडा ओरडताच भलतेच...

नको त्या अवस्थेत आईला बघून ; ‘मी पप्पांना सांगणार’..! चिमुरडा ओरडताच भलतेच घडले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

उत्तरप्रदेश :- आईनेच प्रियकराच्या मदतीनने पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.मुलाने आईला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते.अनैतिक संबंध लपवण्यासाठी महिलेने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या मुलाची हत्या केली असल्याचे समोरे आले आहे.

दहा वर्षांचा वरुण खेळता-खेळता बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे मामा उमेश कुमार यांनी १६ जानेवारीला नोंदवली.त्यांनी या प्रकरणी चांदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढच्याच दिवशी,१७ जानेवारीच्या संध्याकाळी पाच वाजता वरुणचा मृतदेह गावाजवळ असलेल्या जंगलात सापडला.वरुणची हत्या गळा आवळून झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आले.या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली.वरुणची आई मुन्नी आणि तिचा प्रियकर टिंकू चुन्नी यांना पोलिसांनी अटक केली.

दोन आरोपींचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. १६ जानेवारीला मुन्नीचा पती बाहेर गेला होता. हीच संधी साधून टिंकू मुन्नीच्या घरी टिंकू मुन्नीच्या घरी गेला. त्यावेळी बाहेर खेळत असलेला वरुण अचानक घरी पोहोचला. त्यानं आईला टिंकूसोबत पाहिलं. टिंकू वरुणचा काका लागतो. वरुणनं पाहिल्यानं आपलं पितळ उघडं पडेल अशी भीती मुन्नी आणि टिंकूला होती. त्यामुळे दोघांनी वरुणची गळा आवळून हत्या केली.

जवळपास तीन तास वरुणचा मृतदेह घरातच होता. रात्र झाल्यानंतर आरोपी टिंकूने वरुणचा मृतदेह जंगलात नेऊन टाकला.वरुणने आईला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले.मी पप्पांना सांगणार असे त्यावेळी वरुण बोलून गेला. हे ऐकताच आई आणि टिंकूनं त्याची गळा आवळून हत्या केली.कोणालाही संशय येऊ नये म्हणून मुन्नीने आसपासच्या घरांमध्ये जाऊन वरुणबद्दल विचारणा केली.मात्र पोलीस चौकशीत गुन्हा उघडकीस आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!