Wednesday, October 7, 2026
HomeUncategorizedअवकाळी पावसाने विट्टाभट्टी व्यावसायिकांचे अतोनात नुकसान….-नुकसानभरपाई देण्याची मागणी….

अवकाळी पावसाने विट्टाभट्टी व्यावसायिकांचे अतोनात नुकसान….-नुकसानभरपाई देण्याची मागणी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

गडचिरोली :- तालुक्यात विट्टाभट्टीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो. खेड्यापाळ्यात आपल्या शेतामधे व्यवसायीक विटाचा व्यवसाय करतात व शहराच्या ठिकाणी घर बांधकाम वा इतर बांधकामांसाठी विक्री करीत असतात.परंतु जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे विटाभट्टी ठेकेदाराच्या  ताळपत्री झाकुन सुद्धा विटा नासधुस झाल्यात.कारागीर बनवित असलेल्या कच्या विटा गळून गेल्यात; त्यामुळे विटाभट्टी व्यवसायाचे लाखोचे नुकसान झाले आहे. परिसरातील शुभम दशमुखे रा.पोर्ला,रवि चुधरी रा.गोगांव,नेताजी झोडगे रा.पोर्ला, रमेश भांडेकर रा.माहेतुकुम,रोहीत बारसागडे रा. पोर्ला तसेच साखरा,काटली,जेप्रा,दिभना, आदि विटा व्यवसायकीचे लाखोंचे नुकसान झाले.मिळणारा घास अवकाळी पावसाने पळविला असल्याने आता पुन्हा विटा कश्या बनवाव्या म्हणुन विटाभट्टी व्यवसायीक चिंतेत पडले आहेत.अवकाळी पावसाने व वादळ वाऱ्याने झालेली विटाभट्टीची नुकसान भरपाई शासन व प्रशासनाने द्यावी; तलाट्यांनी पंचनामे करावे व शासनाकडे अहवाल पाठवून झालेल्या नुकसानाची भरपाई प्रशासनाने द्यावी; अश्या प्रकारचे निवेदन तहसिलदार गडचिरोली यांच्याकडे शुभंम दहामुखे,रवि चुधरी,नेताजी झोडगे,रोहीत बारसागडे,रमेश भांडेकर तसेच इतर विटा भट्टी व्यावसायिकांनी दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये देशात प्रथम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून २०२६ या तिमाहीच्या एकूण डेल्टा रँकिंगमध्ये गडचिरोली जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.कृषी...

राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचा सर्पदंशाने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ)जवानाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत...

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

मंत्रिमंडळ निर्णय; आता पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना जोखीम पत्करून केलेल्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेस आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!