उद्रेक न्युज वृत्त :- समाजात, जनमाणसांत डाक्टरांना ज्या प्रमाणे डॉक्टर असे प्रतिष्ठतेचे संबोधन म्हणून ओळख असते, त्याप्रमाणे आता शिक्षकांनाही अशी ओळख मिळाली आहे.गुरू,शिक्षक हा श्रेष्ठच असतो त्यांना आदराचे श्रद्धेचे स्थान असते आता ही ओळख शब्द रूपात शिक्षकांच्या नावामध्येही संबोधित केली जाणार असून शिक्षकांच्या नावापुढे टीआर असे प्रतिष्ठतेचे संबोधन असणार आहे.राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहराव तसेच संबोधन ओळख याबाबत संदर्भात मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. यामध्ये शिक्षकांसाठी पेहरावाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. महिला शिक्षकांनी साडी,चुडीदार-सलवार,कुर्ता,दुपट्टा अशा पद्धतीने तर पुरुष शिक्षकांनी शर्ट,ट्राउझर पँट, शर्ट इन करून पेहराव करावा; शाळेने शिक्षकांसाठी एकच ड्रेसकोड, रंग निश्चित करावा, योग्य अशी पादत्राणे असावीत, वैद्यकीय कारण असल्यास पुरुष, महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी, स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचाच पेहराव असेल, असे नमूद करण्यात आले आहे.
प्रतिष्ठेचे संबोधन……
पीएचडी, डॉक्टर, वकील यांना त्यांच्या नावापूर्वी विशिष्ट शब्दाने संबोधण्यात येते. त्याचप्रमाणे आता शिक्षकांना त्यांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत दी.तर मराठी भाषेत टी,असे संबोधन लावण्यास राज्य शासनाने मुभा दिली आहे. यासंदर्भातील लोगो अर्थात बोधचिन्ह शिक्षण आयुक्तांकडून निश्चित केले जाणार आहे.हे संबोधन व लोगो शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

