Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीअज्ञात इसमांनी तनशीचे ढिगारे जाळले अन् संधी साधून चोरट्यांनी रक्कम केली लंपास…मुलीचे...

अज्ञात इसमांनी तनशीचे ढिगारे जाळले अन् संधी साधून चोरट्यांनी रक्कम केली लंपास…मुलीचे लग्न करावे कसे?आई वडील चिंताग्रस्त… -कुटुंबीयांस मदत करण्याचे नागरिकांना आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

प्रा.मुनिश्र्वर बोरकर/ गडचिरोली :- चामोर्शी तालुक्याच्या  सोमनपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मौजा धर्मपुर (१५ नंबर) येथील एका शेतकऱ्याच्या तनशीच्या ढिगाऱ्याला अज्ञात ईसमांनी आग लावली.आगीत जळत असणारे तणशीचे ढिगारे विझविण्यासाठी अख्खा गाव धावला अन् त्याच दरम्यान चोरट्यांनी संधीचे सोने साधुन मुलीच्या लग्न घरातील ८० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले असल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार,मुलीच्या लग्नाची लग्न पत्रिका निघाली होती व अवघ्या चार दिवसावर लग्न येवून ठेपले होते.अश्या परिस्थितीत सदर घटना घडल्याने मुलीच्या आई-वडीलांनी काय करावे?असा प्रश्न निर्माण झाला आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यांतील सोमनपल्ली गट ग्रामपंचायतिच्या मौजा धर्मपूर येथील गुरुदास जयराम पेंदोर यांचे घरी  अंगणात असलेल्या तनशीच्या ढिगाऱ्याला आग लागली व घरातील सर्व सदस्य आग विजविण्यात व्यस्त पाहून दिनांक – २१ फेब्रुवारी २०२४ रोजी बुधवारला मुलींच्या लग्नासाठी जमा केलेली जमापुंजी रोख ८० हजार रुपयाची चोरी झाली.उद्याला सदर  परिवारात मंडप पूजनाचा कार्यक्रम आहे आणि परवा म्हणजेच दिनांक- २७ फेब्रुवारी रोजी लग्नविधी आहे. परंतु घरामध्ये चोरी झाली असल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.कुठलाच आधार नसल्यामुळे मरावे की काय करावे? असा प्रश्न कुटुंबावर उभा येऊन ठाकला आहे.मुलींच्या आणि कुटुंबाच्या लग्न स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी दानशुरांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सदर व्यक्ती हे अतिशय गरीब असुन स्वतःची शेतजमीन ठेक्याने देऊन पैसे जमा केले होते व आता त्यांच्या कडे पैसे नसुन मुलीच्या लग्नाची चिंता आई वडिलांना पडली आहे.समस्त नागरिकांनी शक्य होईल तेवढे कुटुंबास आर्थिक मदत करावी; किमान त्यांचे मंडप पूजन आणि लग्न सोहळा पार पडेल… असे सामाजीक कार्यकर्ते बादल मडावी यांनी म्हटले आहे.

Phone pay no.9503129793 Badal Madavi

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!