उद्रेक न्युज वृत्त :-पत्नी पतीकडून भरणपोषणाची मागणी करते.पण पत्नी पतीला भरणपोषणाचे पैसे देणार असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.बुधवारी न्यायालयाने पत्नीला दरमहा पतीला पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.अमन वय २३ वर्षे आणि नंदिनी वय २२ वर्षे यांची मैत्री झाली.यानंतर दोघांमधील संवाद वाढू लागला.नदिनीने अमनला प्रपोज केले. पण अमनला लग्न करायचे नव्हते.त्यामुळे नंदिनी अमनला धमकावू लागली.यानंतर अमनने जुलै २०२१ मध्ये नंदिनीशी लग्न केले.दोघेही इंदूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहू लागले.मात्र अमनचे कुटुंब या लग्नामुळे खूश नव्हते.अमनने सांगितले की, लग्नानंतर तो नंदनीसोबत ओलिस असल्यासारखा राहत होता. म्हणूनच अमन नंदिनीला सोडून गेला.नंदिनीने अमनच्या हरवल्याची तक्रार नोंदवली.तिथे घरी पोहोचल्यावर अमनने घरच्यांना सगळी हकीकत सांगितली.यानंतर अमनने त्याच्या वकिलामार्फत नंदिनीची पोलिसांत तक्रार केली.यानंतर अमनने फॅमिली कोर्टात मेंटेनन्स केस दाखल केली.मात्र,तिला अमनसोबत राहायचे आहे; असे नंदिनीने कोर्टात सांगितले.नंदिनीने न्यायालयाला सांगितले की,ती कोणतेही काम करत नाही; अशा स्थितीत दर महिन्याला ती देखभाल भत्ता कसा देणार ? मात्र पुराव्याअभावी नंदनी यांचा युक्तिवाद फेटाळण्यात आला.तिचा नवरा पैसे कमवतो,पण तिच्याकडे याचा पुरावा नव्हता; त्यामुळे हा युक्तिवादही फेटाळला गेला,असेही तिने कोर्टात सांगितले.
अमनने न्यायालयात सांगितले की, ‘मी १२ वी पास आहे.नंदिनीमुळे माझा अभ्यास सुटला आहे.तिने माझा छळ केला आहे.नंदिनीचे आई-वडीलही मला त्रास देत असत.मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता; पण नंदिनीच्या दबावामुळे माझा अभ्यास अपूर्ण राहिला.अमन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करताना नंदिनीने पोलिसांना सांगितले होते की, ती ब्युटी पार्लर चालवते.याचआधारे कोर्टात नंदिनीचा खोटेपणा उघड झाला. यानंतर न्यायालयाने नंदानी यांना मासिक खर्च म्हणून अमनला देखभाल भत्ता देण्याचे आदेश दिले.आता नंदनीला तिच्या पतीला देखभाल भत्ता म्हणून दरमहा ५००० रुपये द्यावे लागतील; असा निर्वाळा इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयाने दिला.

