उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत देसाईगंज तालुक्यापासून ते गडचिरोली पर्यंत आमरण उपोषणाचा पावित्रा घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके यांना वारंवार अधिकारी तसेच कर्मचारी वर्गांकडून भुलथापा देऊन आमरण उपोषणावरून उठविण्यात आले.मात्र सदर आमरण उपोषणाची अजून पावेतो दखल घेण्यात आली नसल्याने देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे चित्रपट अजूनही बाकीच असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार,निलंबित झालेला व्यक्ती स्वतःला हुशार समजून पूर्वी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रसदी देऊन; स्वतः च आपला बोलबाला करून; छपाई करण्याचा जणूकाही फंडाच वापरीत असल्याचा हल्ली प्रकार उघडकीस आला आहे.अशातच नाहक कर्मचाऱ्यांना बळी पाडून त्यांच्याकडून वसुली करून मोठ्या अधिकाऱ्यांना हिष्याची रक्कम देऊन स्वतः च खिसे गरम करण्यात. मग्न असल्याची चर्चा जन माणसात सुरू असल्याने एक दिवस मोठा फटाका फुटणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे.त्यामुळे जरा सांभाळून…..पुढील घंटा तपासावी…?

