Monday, September 7, 2026
Homeगोंदियात्याने' मस्त ढोसली दारू; नशेत उठला रात्री अन् अनर्थ घडला विहिरीत…

त्याने’ मस्त ढोसली दारू; नशेत उठला रात्री अन् अनर्थ घडला विहिरीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- दिवसेंदिवस तळीरामांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे.हल्ली अमुक-तमुक पार्ट्या करून नाच गाण्यांसोबतच दारू ढोसण्याचा ट्रेण्ड वाढलेला दिसून येत आहे.पार्टी असो वा नसो घोटभर दारू पिल्याशिवय अनेकांना जमेना…असे चित्र निर्माण झाले आहे.बरेचसे तळीराम दारूच्या आहारी जाऊन आपले जीव गमावू लागले आहेत.असाच प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील तिडका गावात उघडकीस आला आहे.

 तिडका येथील मच्छिंद्र वासुदेव गावतुरे वय २९ वर्षे हा तरुण मद्याच्या धुंदीत ३ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजता लघुशंकेकरिता घरातून बाहेर अंगणात गेला; परंतु अंगणात असलेल्या समांतर विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.या घटनेसंदर्भात मधुकर रामाजी गावतुरे वय ५५ वर्षे,रा.तिडका यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इलमे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!