Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोली१० डिसेंबरला गडचिरोली येथे नाट्यश्री कविसंमेलन व प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन…..

१० डिसेंबरला गडचिरोली येथे नाट्यश्री कविसंमेलन व प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री’ च्या वतीने झाडीपट्टीतील नाटककार “चुडाराम बल्हारपुरे” संपादीत व मधुश्री प्रकाशन,पुणे प्रकाशित “रानगर्भ फुलत आहे” या प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन व लोकार्पण येत्या रविवारी १० डिसेंबरला  झाडीपट्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ रंगकर्मी व समिक्षक प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर यांचे हस्ते लहू मडावी सभागृह,दि.आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था,सत्यम टॉकीज जवळ,बसस्टॉपचे बाजूला, धानोरा रोड,गडचिरोली येथे संपन्न होणार आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष “ऊर्मी”कार प्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रभाकर तांडेकर “प्रदत्त” हे राहणार असून प्राचार्य राजेंद्र कांबळे,नागपूर हे पुस्तकावर भाष्य करणार आहेत.तर  प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,सिंदेवाही हे काव्य समीक्षण करणार आहेत.विशेष अतिथी म्हणून  घनश्याम मडावी अध्यक्ष,दि.आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था,गडचिरोली हे उपस्थित राहणार आहेत.या प्रसंगी खडकी/बामणी येथे आयोजित ३१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे (साहित्यिक व कवी) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.नाट्यश्रीचे कलावंत व संगीतकार दिलीप मेश्राम,विजया पोगडे हे महामृत्युंजय मार्कंडेश्वर या नाटकातील नांदी व स्वागतगीत सादर करणार आहेत.

या निमित्ताने झाडीपट्टीतील निवडक कवींचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ५२ कवी सहभागी झालेले आहेत.तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त कवी,  साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे, योगेश गोहणे,प्रा.अरुण बुरे व सौ.कुंदा बल्हारपूरे यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!