उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्याच्याभामरागड तालुक्यात पेनगुंडा येथे बुधवारी रात्री नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पेनगुंडा गावात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यासाठी दिनेश पुसू गावडे वय २७ वर्षे रा.लाहेरी ता.भामरागड हा लाहेरीवरून १५ नोव्हेंबरला पेनगुंडा येथे गेला होता.रात्री बंदुकधारी नक्षल्यांनी गावात प्रवेश करून गावाबाहेर नेले.त्याठिकाणी तीक्ष्ण हत्याराने हत्या केली.हत्येनंतर नक्षल्यांनी दिनेशनच्या मृतदेहाजवळ पत्रक टाकले.त्यामध्ये दिनेश हा पोलिस खबऱ्या असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे.गुरुवारला सकाळच्या सुमारास दिनेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भामरागड तालुका मुख्यालयात आणण्यात आला.पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक – नीलोत्पल 👇
दिनेश हा पोलिसांचा खबरी नसून सामान्य माणूस होता.पेनगुंडा येथे आयोजित क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी तो गेला होता. त्याठिकाणी नक्षलवाद्यांनी त्याला पकडले आणि पोलिस खबऱ्या असल्याचा आरोप करून त्याची हत्या केली.निष्पाप लोकांची हत्या करून नक्षलवादी दहशत पसरवीत आहेत.

