Friday, June 26, 2026
Homeगडचिरोलीघरकुल बांधकामास आधार देणारेच झाले निराधार....!'नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी'….कंत्राटी...

घरकुल बांधकामास आधार देणारेच झाले निराधार….!’नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी’….कंत्राटी अभियंत्यांचे ८ महिन्यांपासून रखडले मानधन…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- ग्रामीण भागातील गोर गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुल बांधकामाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांचे गेली ८ महिन्यांपासून मानधन रखडले असल्याने घरकुल बांधकामास आधार देणारेच निराधार झाले आहेत.अशातच ‘करीत रहा काम; तुम्हाला मिळणार नाही दाम’ असे हल्ली ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या बाबतीत दिसून येत असल्याने घरकुल योजनेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या अभियंत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंते(इंजिनिअर) घरकुल योजनेतील महत्वाचा दुवा समजला जातो आहे.घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होण्यापासून तर बांधकाम पूर्ण होण्यास्तवची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.जसे,कितीतरी किलोमीटर अंतरावरील घरकुल लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी देणे,बांधकामाची आखणी करून देणे, टप्पे निहाय घरकुल बांधकामाचे फोटो काढून नेणे, लाभार्थ्यांना हफ्ते वितरीत करणे,वेळोवेळी बांधकामा संबंधी तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे व इतर अशी अनेक कामे अभियंते करीत असतात.मात्र गेली ८ महिन्यांपासून ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांचे मानधन मिळाले नसल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या घरा पर्यंत जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशातच वेळेवर मानधन मिळत नसल्याने अभियंत्यांवर उपासमारीची पाळी बरोबरच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.’नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी’अशी अवस्था हल्ली ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांची झाली आहे.

मिळणारे मानधन अत्यल्प असूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने कुटुंब सांभाळावे कसे?कामे करायची कशी?असा विचार अभियंत्यांच्या मनात घर करून सोडत आहे.कित्येकदा संप पुकारून आंदोलने करण्यात आली.मात्र शासनास केव्हा जाग येणार? हे अनेकांना कळेनासे झाले आहे.एकीकडे कामे करवून घेणे व कंत्राटी कर्मचारी वर्गांचे शोषण करणे असे दिसून येत आहे.नियमित कर्मचारी वर्गांचे वेळेवर वेतन न मिळाल्यास त्यांना कसे वाटणार? यासाठी शासनाने मानधनात वाढ करून गेली ८ महिन्यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे; तसेच वेळेवर मानधन देण्यात यावे; अशी मागणी ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. – ५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत मिळणार कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच वडार,रामोशी,लोहार,गवळी, विणकर आणि नाथपंथी समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक बळ मिळावे,रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि...

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!