Tuesday, October 27, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.त्यापैकी सध्या २० केंद्रांवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू असून, पात्र धान उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित केंद्रावर नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशानुसार कुरखेडा,कोरची,आरमोरी,धानोरा आणि घोट या उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.सध्या भाडभिडी,कुरखेडा,गेवर्धा, सोनसरी,शिरपूर,मध्यवर्ती गोदाम आरमोरी, कुरुंडीमाल,उराडी,अंगारा,मध्यवर्ती गोदाम पोटेगाव, मध्यवर्ती गोदाम नवेगाव गडचिरोली,तसेच कोरची, कोटगुल,मसेली,पुराडा,मालेवाडा,धानोरा,मुरुमगाव, रांगी आणि कारवाफा या २० केंद्रांवर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय धान खरेदी केंद्रावर स्वतः उपस्थित राहावे.आधार कार्ड, बँक पासबुक,सातबारा उतारा,आधारसंलग्न मोबाइल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रे केंद्रावर सादर करावीत.शासनाने निर्धारित केलेल्या ‘BeAM’ पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे.
धान खरेदीचे वेळापत्रक आणि शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराची माहिती संबंधित खरेदी केंद्र व कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व पात्र धान उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संभारे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!