Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीबिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख रुपये लाचेची मागणी करून सुरुवातीला ३० हजार रुपये रोख व उर्वरित रकमेची मागणी करताच सापळा कारवाई करण्यात आली.यात स्विकृत नगरसेवकाने १ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.ही कारवाई काल गुरुवारी अहेरी येथे करण्यात आली.अमोल विलासराव गुडेलिवार वय ४० वर्षे,पद-स्विकृत नगरसेवक,नगरपंचायत अहेरी,ता.अहेरी.जि. गडचिरोली मुळ पत्ता-प्रभाग क्र.९ राजे विश्वेश्वरराव महाराज चौक,बसस्टॉप रोड अहेरी,ता.अहेरी जि. गडचिरोली असे लाचखोर आरोपीचे नाव आहे.
प्रकरणातील तक्रारदार हे ३३ वर्षीय पुरुष विद्युत ठेकेदार असून त्यांची ठेकेदारी फर्म व अहेरी येथे विद्युत साहित्याचे दुकान आहे.तक्रारदार यांच्या मित्राच्या ठेकेदारी फर्मला नगरोत्थान योजना सन २०२५-२६ अंतर्गत मौजा-अहेरी येथील प्रभाग क्र.१ ते १० मध्ये ९ लाख ९३ हजार ९०९ रुपये व प्रभाग क्र.११ ते १७ मध्ये ९ लाख ९३ हजार ८५६ रुपये असे एकूण १९ लाख ८७ हजार ७६५ रुपये किंमतीचे अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याचे काम मंजूर झाले होते.तक्रारदार यांनी मित्राच्या फर्मसोबत करार करून प्रभाग क्र.११ ते १७ मधील काम पूर्ण केले,तसेच मित्राच्या विनंतीवरून प्रभाग क्र.१ ते १० मधील कामावरही देखरेख ठेवली.दोन्ही कामे विहित १८० दिवसांच्या मुदतीत पूर्ण झाली असून त्यांची संपूर्ण बिले अदा झाली होती.त्यानंतर नगरपंचायत अहेरी येथील नगरसेवक आरोपी अमोल विलासराव गुडेलीवार यांनी सदर कामे जिल्हा नियोजन समिती गडचिरोली येथून स्वतः मंजूर करून आणल्याचे सांगून बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीस ३० हजार रुपये रोख दिले होते.त्यानंतर आरोपी उर्वरित २ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याने तक्रारदार यांनी १५ ऑक्टोंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,गोंदिया येथे तक्रार दिली.त्यानुसार,पंच व व्हॉईस रेकॉर्डरसह तक्रारदार यांना आरोपी अमोल विलासराव गुडेलीवार यांच्या श्रीराम ट्रेडर्स,मुख्य चौक,बस स्टॅण्ड रोड,अहेरी येथील हार्डवेअर दुकानात लाच मागणी पडताळणीसाठी पाठविण्यात आले. त्यावेळी आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडे उर्वरित २ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी करून,त्यापैकी सध्या उपलब्ध असलेली १ लाख २० हजार रुपयांची रक्कम थोड्या वेळात आणून देण्यास सांगितले. त्यानंतर,तक्रारदार यांना पंच व व्हॉईस रेकॉर्डरसह लाचेची १ लाख २० हजाराची रक्कम घेऊन आरोपीच्या श्रीराम ट्रेडर्स,अहेरी येथील दुकानात पाठविण्यात आले.त्यावेळी आरोपी अमोल विलासराव गुडेलीवार यांनी तक्रारदार यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच आरोपी यांना पथकाने ताब्यात घेतले. यातील आरोपीचे कृत्य भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८(संशोधन सन २०१८)कलम ७ अन्वये अपराध होत असल्याने सापळा अधिकारी अरविंद राउत,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,गोंदिया यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन अहेरी अप.क्र.३६८/२०२६ अन्वये काल,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई सापळा अधिकारी अरविंद राउत,पोलीस निरीक्षक, लाप्रवि गोंदिया,पर्यवेक्षक अधिकारी निलेश लोधी,पोलीस उपअधीक्षक लाप्रवि गोंदिया,तपासी अधिकारी किरण बगाटे,पोलीस निरीक्षक,लाप्रवि गडचिरोली,सापळा पथक-पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी,पोलीस निरीक्षक अरविंद राउत,सफौ/चंद्रकांत करपे,पोहवा/संजयकुमार बोहरे, पोहवा/मंगेश कहालकर,पोना/संतोष शेंडे,पोना/संतोष बोपचे,पोना/दिपक बाटबर्वे सर्व लाप्रवि गोंदिया, मार्गदर्शन-दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपुर,श्रीमती माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागुपर,विजय माहुलकर, अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई पार पडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!