- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध बांधकामांच्या अंदाजपत्रकामध्ये जादाचे मुल्यांकन दाखवून शासकिय निधीचे नुकसान करणे व इतर अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी निलेश पी.जवंजाळकर यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.या संदर्भात नुकतेच गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आदेश जारी केला.निलेश जवंजाळकर यांचे निलंबन काळातील मुख्यालय पंचायत समिती,सिरोंचा येथे ठेवण्यात आले असून त्यांना कार्यालय प्रमुखाचे पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गावाचे सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून विविध विकास कामांकरीता ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो.मात्र,गावगाडा हाकणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना प्राप्त निधी व त्यावरील खर्च निधी किती?याची माहिती नसल्याने अनेकांची फोडणी साधतांना दिसून येते.अश्याच प्रकारे पंचायत समिती कुरखेडा अंतर्गत ग्रामपंचायत पुराडा येथे निलेश पी.जवंजाळकर हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असतांना जीइएम पोर्टल(Gem Portal)वर खरेदी न करणे,अर्थ संकल्पीय तरतूदी शिवाय व तरतूदीपेक्षा नियमबाह्य जादादर खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे व कायदेशीर विनियोग न दाखवणे,१४ व १५ वा वित्त आयोगाअंतर्गत विविध बांधकामांच्या अंदाजपत्रकामध्ये जादाचे मुल्यांकन दाखवून शासकिय निधीचे नुकसान करणे,१४ व १५ वा वीत्त आयोगाचे देयके प्रदान करण्यापूर्वी कार्यालयीन टिपणी-मसुदाचा वापर न करणे व इतर गैरवर्तणूकीच्या बाबी करीत असल्याने त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यास कुरखेडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रस्ताव सादर केला होता.या प्रकरणी निलेश जवंजाळकर यांनी नियत कर्तव्यात कसूर करुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा(वर्तणुक)नियम व १९६७ चे नियम ३ चा भंग केल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे पुराडा येथील दप्तराची सखोल तपासणी करण्याकरिता व त्यांनी तपासणीकामी अडथळा आणु नये म्हणुन महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा(शिस्त व अपील)नियम १९६४ मधील ३(१)(अ)नुसार जवंजाळकर यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान,महाराष्ट्र नागरी सेवा(निलंबन,बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने)नियम १९८१ चे नियम ६८ मधील तरतुदीनुसार निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील.सदर भत्ता त्यांच्या सरासरी अर्धपगारी रजेबरोबर राहील व त्यावर अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.निलंबन कालावधीत त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा(पदग्रहण अवधी स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने)नियम १९८१ चे नियम ६९ च्या पोटनियम ४ मधील तरतुदीनुसार कोणतीही खाजगी नौकरी तथा धंदा करता येणार नाही,तसे केल्यास ते शिक्षेस पात्र राहतील. तसेच प्रत्येक महिण्यात तसे प्रमाणपत्र प्रस्तुत केल्याशिवाय निलंबन भत्ता प्रदान केला जाणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

