- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी जप्त केले.पोलिसांना नक्षलवाद्यांनी सीमावर्ती जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि स्फोटक साहित्त्ये लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ६ ऑक्टोंबर रोजी विशेष अभियान पथकाच्या प्राणहिता येथील पाच तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या दोन तुकड्यांनी कोपर्शी जंगल परिसरात शोधमोहीम राबवली.दरम्यान,परिसरात जवानांनी कसून तपासणी केली.त्यावेळी एका ठिकाणी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आढळून आला. त्यात एक ३०३ रायफल,२ सिंगल शॉट रायफल,२ गावठी पिस्तुले आणि १ बीजीएल लॉन्चर यांचा समावेश आहे. याशिवाय १० बीजीएल सेल,२१ जिवंत काडतुसे,७ डेटोनेटर,१५० मीटर केबल वायर,२ मॅगझिन,२ कुकर,३ वॉकीटॉकी,३ चार्जर आणि २ वॉकीटॉकी बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या.जप्त करण्यात आलेल्या साहित्याव्यतिरिक्त अन्य नक्षलवादी साहित्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान)कार्तिक मधीरा,अप्पर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी.,अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता)हर्षवर्धन बि.जे.,पोलीस उपअधीक्षक (अभियान)सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक,प्राणहिता व बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या जवानांनी केली.
- Advertisement -

