- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व दुर्गम भागांतील पात्र मुलींपर्यंत लसीकरणाची सुविधा पोहोचविण्यावर भर देण्यात येत असून आतापर्यंत १२ तालुक्यांतील एकूण १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना लस देण्यात आली आहे.
१४ वर्षे पूर्ण ते १५ वर्षे ९० दिवसांपेक्षा कमी या वयोगटातील मुलींना ही लस देण्यात येते.जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या माहितीनुसार,मोहिमेसाठी नियोजित ८६६ लसीकरण सत्रांपैकी आतापर्यंत ५४८ सत्रे पूर्ण झाली आहेत.
तालुकानिहाय एकत्रित आकडेवारीनुसार,धानोरा तालुक्यातील २९४,आरमोरी २२७,सिरोंचा १६८ आणि चामोर्शी तालुक्यातील ११० मुलींना लस देण्यात आली आहे.तसेच कोरची येथे ९७,अहेरी येथे ७५, भामरागड येथे ६४ आणि गडचिरोली येथे ५८ मुलींचे लसीकरण झाले आहे.कुरखेडा येथे ५२ एटापल्ली येथे ५१,मुलचेरा येथे ३४ आणि देसाईगंज येथे २४ मुलींना लस देण्यात आली आहे.अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत मिळून १ हजार २५४ मुलींचे लसीकरण झाले आहे.
जिल्हा रुग्णालय,महिला रुग्णालय,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध आरोग्य संस्थांमार्फत लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पालकांनी आपल्या मुलीची लसीकरणासाठी पात्रता, उपलब्ध सत्रांचे वेळापत्रक आणि लसीकरणाच्या ठिकाणाबाबत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा संबंधित शासकीय रुग्णालयात माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
- Advertisement -

