Tuesday, September 29, 2026
Homeगडचिरोलीपूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार ही तातडीची मदतकार्य मोहीम राबविण्यात आली.
काल शनिवारी बिनागुंडा येथून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या संगीता चुक्कू उसेंडी या सात वर्षीय मुलीला आज रविवारी लाहेरी येथून हेडरी येथील रुग्णालयात पोहोचविण्यात आले.तसेच अपेक्षा ऋषी आलाम आणि रोशन चिना मडावी या दोन रुग्णांनाही पुढील उपचारांसाठी हेडरी येथे हलविण्यात आले.प्राप्त माहितीनुसार,या रुग्णांमध्ये सिकलसेलचा त्रास असलेल्या रुग्णाचाही समावेश आहे.वैद्यकीय कामासाठी या भागात उपलब्ध असलेल्या लॉइड्स मेटल्स कंपनीच्या हेलिकॉप्टरचा आपत्कालीन स्थितीत तत्परतेने वापर करण्यात आला.आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत आणि भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी रुग्णांना हलविण्यासाठी आवश्यक उपाययोजना व समन्वय केला.रुग्णांसोबत निर्मला आलाम आणि चिना कुड्यामी हेही होते.प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे तीनही रुग्णांना वेळेत पुढील वैद्यकीय उपचारांसाठी पोहोचविण्यात यश आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय आष्टी,उपजिल्हा रुग्णालय अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे भेट देऊन...

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!