- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक इम्रान शेख हे गंभीररीत्या जखमी झाले,तर त्यांच्या पत्नी व मुले सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.ही
घटना काल शुक्रवारच्या सायंकाळी पोर्ला गावाजवळ घडली.

माहितीनुसार,इम्रान शेख हे एमएच ३१ जीए ७८६३ क्रमांकाच्या कारने कुटुंबीयांसह चामोर्शी येथे कौटुंबिक कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले होते.प्रवास सुरू असतांनाच गडचिरोलीपासून सुमारे १५ किलोमीटर आधी गडचिरोलीहून देसाईगंजकडे निघालेली एसटी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की,कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाला.या अपघातात इम्रान शेख गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.त्यानंतर,जखमींना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.इम्रान शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.इंटरनल ब्लीडिंगच्या शक्यतेने डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार करण्यात आले.मात्र,त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरला हलवण्यात आले.त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली उपचार सुरू आहेत.दरम्यान,भीषण अपघातामुळे गडचिरोली-देसाईगंज मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
- Advertisement -

