Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोली'युजीसी-नेट' परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित ‘विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे येत्या,बुधवार ९ व १० सप्टेंबर २०२६ रोजी दोन सत्रांत होणार आहे.परीक्षा शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडावी,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या कलम १६३ अन्वये परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी केला आहे.
परीक्षा केंद्राच्या निषिद्ध क्षेत्रात परीक्षा कालावधीत झेरॉक्स मशीन,फॅक्स व एसटीडी बूथ सुरू ठेवण्यास तसेच मोबाईल फोन,लॅपटॉप,पेजर,टेपरेकॉर्डर, कॅमेरा आदींच्या वापरास मनाई राहील.पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.नारेबाजी,घोषणा, भाषण,वाद्य वाजविणे तसेच शस्त्रे,दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यासही प्रतिबंध राहील.परीक्षा केंद्रावर अनधिकृत व्यक्ती व वाहनांना प्रवेश करता येणार नाही. हा मनाई आदेश ९ व १० सप्टेंबर रोजी सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत लागू राहील. कर्तव्यावरील अधिकारी व कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात पोलीस अधिकारी यांना आदेशातून वगळण्यात आले आहे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल,असे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!