Friday, October 9, 2026
Homeगडचिरोलीअचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सोमवारच्या सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान गडचिरोली शहराच्या मूल मार्गावरील महिला महाविद्यालयाजवळ घडली.सुजल सुरेश तागडे वय २० वर्षे,रा.आनंदनगर,गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.तर प्रज्ज्वल बाळकृष्ण पेंदाम वय १९ वर्षे,रा.फरी,ता. कुरखेडा,जि.गडचिरोली असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सोमवारच्या सायंकाळी दोघेही तरुण काही कामानिमित्त त्यांच्या दुचाकीने गडचिरोली शहराच्या कॉम्प्लेक्स एरिया परिसरातून शहराच्या मुख्य चौकाकडे इंदिरा गांधी चौकात जाण्यासाठी निघाले होते.मार्गावरून जात असतांनाच मूल मार्गावरील महिला महाविद्यालयाजवळ एक कार वळण घेत होती.दरम्यान,भरधाव वेगात असलेली दुचाकी वळण घेणाऱ्या कारला जाऊन जोरात धडकली.यात दोघेही तरुण दुचाकीवरून उसळून पडले. दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांना तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच सुजलचा मृत्यू झाला.तर प्रज्ज्वल पेंदाम याचेवर उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!