Saturday, August 22, 2026
Homeगडचिरोलीपूरबाधित ५०० कुटुंबांना आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

पूरबाधित ५०० कुटुंबांना आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात  जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे आज शुक्रवारी वाटप करण्यात आले.तहसील प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार निश्चित करण्यात आलेल्या ५०० पूरबाधित कुटुंबांना खासगी संस्थेमार्फत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे भामरागड येथे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती.पुराचे पाणी वस्तीत शिरल्याने अनेक कुटुंबांचे अन्नधान्य व घरगुती साहित्याचे नुकसान झाले. या काळात सुमारे ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.पूर ओसरल्यानंतर तहसील प्रशासनाने बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण करून मदतीसाठी ५०० कुटुंबे निश्चित केली.वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये तांदूळ,गहू, तूरडाळ,पोहे,साखर,खाद्यतेल,मीठ,मसाले,साबण,केसांचे तेल तसेच ब्लँकेट आदी वस्तूंचा समावेश होता.याशिवाय २०० स्टेशनरी किटचेही वाटप करण्यात आले.यावेळी भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे,नायब तहसीलदार राजीव निखत,तहसील कार्यालयाचे अधिकारी,कर्मचारी तसेच टाटा स्टील फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात...

आता पोलीस दलातून निवृत्त होणारे श्वान राहणार पोलीस दलाचाच भाग..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस  दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.यापुढे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्वान पोलीस दलाच्या सेवेतून...

घरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिस व पुरवठा शाखेच्या संयुक्त पथकाने दोघांना ताब्यात घेत अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा...

वाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम – राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकी पेशातून समाजसेवेच्या व्यापक क्षेत्रात आणि तेथून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!