Saturday, June 27, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी,दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा देऊळगांव जवळ भीषण अपघात...- अपघातात दुचाकीने पेट...

मोठी बातमी,दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा देऊळगांव जवळ भीषण अपघात…- अपघातात दुचाकीने पेट घेतला तर चारचाकी वाहन चेंदामेंदा- आरमोरी तालुक्यातील आत्ताची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुनिश्वर बोरकर/गडचिरोली

गडचिरोली:- चारचाकी वाहन धारकाने दुचाकी वाहन धारकांस वाचविण्याच्या प्रयत्नात आज ३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दोघांमध्ये आरमोरी तालुक्यातील देऊळगांव(पंट्रोल पंप) जवळच भिषण अपघात झाला.

दुचाकीस्वार तिघे जण जखमी झाले असुन चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन सदर गाडीचा पूढील भाग चेदामेंदा झाला.सविस्तर वृत्त असे की,चारचाकी वाहन क्रमांक- MH३२ AH ६६७७ क्रेटा हि वर्धा वरून गडचिरोली जात होती तर दुचाकी वाहन धारक गडचिरोली वरून आरमोरी कडे जात होते.आरमोरी पोलिस स्टेशन अंतर्गत देऊळगांव जवळ ( पेट्रोल पंप) जवळ या दोघांचा भिषण अपघात घडला.दुचाकीवर  तिघे जण होते.त्यांच्या मागुन एक चारचाकी वाहन येत होते.त्यामुळे वर्धा वाल्या गाडी मालकाने दुचाकी वाल्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सदर भिषण अपघात घडला.यात सोमेश्वर बावणे ५२ वैरागड , गणेश नवघरे गणेशपुर (शिर्शी) व एक तिसरा व्यक्ती त्याचे नाव कळू शकले नाही.तो गंभीर जखमी आहे. तर गणेश नवघरे यांच्या पायाला जबर मारहान आहे.मात्र चारचाकी वाहनातील सुखरूप असुन त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला गेल्यामुळे सदर गाडीचा पुढील भाग चेंदामेंदा झाला आहे.महत्वाची बाब अशी की दुचाकी वाहनाने पेट घेवून जळून खाक झाली.मात्र तिघेही गाडीवरून जिकडे-तिकडे पडल्यामुळे ते बचावले देऊळगाव वासीयांनी लगेच जखमिंनाचा झाडात नेले.रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मुनिश्र्वर बोरकर यांनी पोलिस स्टेशन आरमोरी व अम्ब्युलन्स ला फोन केला.आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले.पुढील तपास आरमोरी पोलीस स्टेशन विभाग करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!