Tuesday, August 25, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरअन् सरपंचाने लाच मागणाऱ्यांच्या विरोधात पंचायत समिती कार्यालय परिसरात नोटांची केली उधळण

अन् सरपंचाने लाच मागणाऱ्यांच्या विरोधात पंचायत समिती कार्यालय परिसरात नोटांची केली उधळण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

छत्रपती संभाजी नगर :- सरकारी काम आणि चार महिने थांब याचा प्रत्यय प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये पाहण्यास मिळतो.असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहण्यास मिळाला.विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत एका सरपंचाने २ लाख रुपये समितीच्या कार्यालयासमोर उधळले.

गावामध्ये विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत, गावाच्या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांच्या बंडालाचा हार गळ्यात घालून थेट फुलंब्रीचे पंचायत समिती कार्यालय गाठले आणि पैशांची उधळण केली.मंगेश साबळे असे या सरपंचाचे नाव असून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत.

गावात विहिरी मंजूर करत नाही यासाठी लाच मागितली म्हणून या सरपंचाने शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले आणि पंचायत समिती कार्यालयात पैसे उधळले.

यावेळी या सरपंचाने राज्य शासनावर टीका करत तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र या ठिकाणी विहीर बांधण्यासाठी या ठिकाणी अधिकारी पैसे मागत आहेत.शेतकऱ्यांनी इतके पैसे कुठून द्यावे,हा त्यांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे, असे म्हणत फुलंब्रीच्या पंचायत समिती कार्यालयाबाहेर या सरपंचाने गळ्यातील बंडलातील नोटांची उधळणही केली.

दरम्यान,शेतात विहीर बांधण्याचा प्रस्ताव कालच पंचायत समितीला प्राप्त झाला आहे.तसेच आम्ही कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केली नाही.उलट त्या सरपंचांनीच पंचायत समितीच्या आवारात येऊन फेसबुक लाईव्हद्वारे नोटा उधळत आमची बदनामी केली याची तक्रार आम्ही फुलंब्री पोलीस ठाण्यात दिली आहे,यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी; अशी प्रतिक्रिया फुलंब्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती कवड देवी यांनी दिली.

( साभार – न्युज १८ लोकमत)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!