- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत झालेली वाढ,एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ,वाहनांचे सुटे भाग,टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ लक्षात घेता एसटीच्या तिकिट दरात तब्बल १३.५६ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. सदरची दरवाढ ही एसटीच्या सर्व बस सेवांसाठी लागू करण्यात आली असून आज शुक्रवारच्या मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे,यापूर्वी एसटी महामंडळाने उन्हाळ्यात १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू केली होती.ती १५ जुलै रोजी संपुष्टात आली होती.त्यानंतर,३१ जुलै पर्यंत हंगामी भाडेवाढ सुरू राहील,असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र,आता १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करून महामंडळाने सरळ १३.५६ टक्के भाडेवाढ कायमस्वरूपी केल्याने सर्वसामान्य प्रवासी नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
- Advertisement -

