Sunday, August 30, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. -...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न जाता आवश्यकतेनुसारच खतांची खरेदी करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यात खतांचा पुरवठा नियमित सुरू असून आवश्यकतेनुसार आणखी खत उपलब्ध करून देण्यासाठीही कृषी विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,खरीप हंगामासाठी युरीया खताचे २१ हजार ५०० मेट्रिक टन वाटप मंजूर करण्यात आले आहे.त्यापैकी आतापर्यंत ९ हजार ८९० मेट्रिक टन खत जिल्ह्यात प्राप्त झाले असून जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे.
संयुक्त खतांसाठी २२ हजार ७०० मेट्रिक टन वाटप मंजूर असून त्यापैकी ५ हजार ८०१ मेट्रिक टन खत प्राप्त झाले आहे.सध्या ६ हजार १४० मेट्रिक टन संयुक्त खताचा साठा उपलब्ध आहे.तसेच MOP खतासाठी ३०० मेट्रिक टन वाटप मंजूर असून त्यापैकी १४३ मेट्रिक टन खत प्राप्त झाले आहे. डिएपी खतासाठी ४ हजार मेट्रिक टन वाटप मंजूर असून सध्या ५६१ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.
डीएपी खताची मागणी लक्षात घेता त्याचा तुटवडा भासू नये म्हणून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये पर्यायी खतांच्या वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.तसेच मागणीनुसार खतांचा पुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.
शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता सहजपणे समजावी यासाठी कृषी विभागाने विशेष ब्लॉगस्पॉट विकसित केला आहे.या माध्यमातून कृषी केंद्रनिहाय कोणते आणि किती खत उपलब्ध आहे,याची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना पाहता येते.
दरम्यान,कोणत्याही खत विक्रेत्याकडून अनुदानित खताची किंवा इतर खतांची कमाल किरकोळ किंमतीपेक्षा(MRP)जास्त दराने विक्री केली जात असल्यास संबंधित विक्रेत्याविरुद्ध तक्रार निवारण समितीकडे ८२७५६९०१६९ या मोबाईल क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.
जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी अनावश्यक साठेबाजी अथवा घाईगडबडीत खरेदी न करता आपल्या पिकांच्या गरजेनुसार नियोजनपूर्वक खतांची खरेदी करावी,असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!