Sunday, October 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- ‘नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही’ अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या विविध भागात कोसळलेल्या पावसाने काहीकाळासाठी दडी मारल्याने विदर्भातील काही भागात खरीप पिके कोमेजू लागली आहेत.पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपडतांना दिसून येतो आहे. पाऊस लांबल्यास काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अश्या स्थितीत प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार,आजपासून म्हणजेच बुधवार १५ जुलै रोजी राज्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि २० जुलैनंतर संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा पूर्ण क्षमतेने सक्रिय होऊन मुसळधार पावसाला सुरुवात होईल.पाऊस आणखी काही दिवस लांबणीवर गेल्यास दुबार पेरणीचे संकटही ओढावू शकते,त्यामुळे येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.हवामान विभागाच्या या नवीन अंदाजामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.२० जुलैनंतर अपेक्षित असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल,तसेच पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरिपाच्या पिकांना जीवदान मिळेल,अशीही आशा आहे.अश्यातच विदर्भात आज प्रामुख्याने काही ठिकाणी कोरडे,तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. विदर्भातील जिल्ह्यासाठी आज अलर्ट देण्यात आलेला नाही.मात्र,उद्यागुरुवार १६ जुलैपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!