Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीमहत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या निर्णयानुसार गडचिरोली आता स्वतंत्र डाक विभाग म्हणून कार्यरत होणार असून ही नवीन प्रशासकीय व्यवस्था उद्या,बुधवार १५ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.
या प्रशासकीय पुनर्रचनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालये स्वतंत्र गडचिरोली विभागीय प्रमुखांच्या नियंत्रणाखाली येणार आहेत.या निर्णयामुळे प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण होण्यास तसेच डाक,आर्थिक आणि डिजिटल सेवांचा अधिक प्रभावी लाभ नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे.
नवीन व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उद्या १५ जुलै २०२६ रोजी गडचिरोली टपाल विभागांतर्गत सर्व टपाल,बचत बँक आणि टपाल जीवन विमा यांसह सर्व प्रकारचे व्यवहार पूर्णपणे बंद राहतील.त्यानंतर गुरुवार १६ जुलै २०२६ पासून सर्व सेवा पूर्ववत नियमितपणे सुरू करण्यात येणार आहेत.या विभाजनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी चंद्रपूर येथे जाण्याची आवश्यकता राहणार नाही.स्थानिक स्तरावरच विविध टपाल,बचत बँक,विमा आणि इतर सेवा अधिक वेगाने उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचा वेळ व खर्चही वाचणार आहे.
प्रशासकीय बदलानंतर दैनंदिन टपाल वितरण,बचत बँक सेवा,विमा सेवा आणि इतर ग्राहकाभिमुख सुविधा अधिक सक्षम व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील,असे डाक विभागाने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी किंवा सेवा सहाय्यासाठी नागरिकांनी चंद्रपूर विभागाच्या ०७१७२-२५५३३७ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा sspcdp.mah@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.तसेच गडचिरोली विभागाशी spgde.mah@gmail.com या ई-मेलद्वारे संपर्क साधता येईल,असे वरिष्ठ डाक अधीक्षक,चांदा विभाग, चंद्रपूर एस.रामा कृष्णा यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!