Wednesday, July 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; शिक्षकांच्या प्रश्नांकडे वेधणार लक्ष..

उद्याला शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; शिक्षकांच्या प्रश्नांकडे वेधणार लक्ष..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकांचे राज्य स्तरावर प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना,शिक्षक संघटना समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी-सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षक संघटना,शैक्षणिक व्यासपीठ,मुख्याध्यापक संघ व अन्य समविचारी शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने उद्या,गुरूवार ९ जुलै रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.या दिवशी राज्याच्या विविध जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक एक दिवसाची सामूहीक रजा घेत धरणे,नारे-निदर्शने व सत्याग्रह आंदोलन करणार आहेत.टीईटीची सक्ती रद्द करणे,१५ मार्च २०२४ चा संचमान्यते बाबतचा शासन निर्णय रद्द करणे,पदोन्नती प्रक्रीयेतील अडथळे दूर करणे,बीएलओसह अशैक्षणिक कामाची सक्ती न करणे,जुनी पेंशन लागू करणे यांसह शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.मागील दोन वर्षांपासून शिक्षक अशैक्षणिक व ऑनलाईन कामाने त्रस्त आहेत.त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून शिक्षकवर्गात संतापाची लाट पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘पावसाळा आला आरोग्य सांभाळा..!’ ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला,डेंग्यू,मलेरिया,टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो.नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,यासाठी सार्वजनिक...

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!