- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली सर्वत्र गौण खनिजांची चोरी ही नित्याचीच बाब झाली आहे.पण,एखाद्या शेतकऱ्यास शेतातील रस्ते दुरुस्ती आणि शेतीसंबंधित कामांसाठी गौण खनिजांची आवश्यकता भासत असेल तर आता कुठलेही शुल्क भरण्याची गरज नसणार आहे.यासंबंधात आज,गुरुवार २ जुलै रोजी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतीसंबंधित कामांसाठी लागणारे गौणखनिज जसे की,रेती,मुरूम,दगड व माती इत्यादी आता पूर्णपणे ‘रॉयल्टीमुक्त’ म्हणजेच वाहतूक करण्यासाठी कुठल्याही परवान्याची गरज भासणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे.मात्र,सदरची सुट ही केवळ शेतातील शेत रस्ते दुरुस्ती आणि शेतीच्या आवश्यक कामांसाठीच लागू राहणार आहे.याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल.अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना या कामासाठी पंधरा दिवसांची अधिकृत परवानगी दिली जाईल.शेतीच्या कामासाठी आणि गौणखनिजाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाणार नाही,असेही महसूलमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.याबद्दल काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनीही या निर्णयाचे स्वागत करत,या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक भार हलका होईल, अशी प्रतिक्रिया दिली.त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे गौणखनिज रॉयल्टीमुक्त(अधिकार शुल्क वगळून) उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाचे विधानसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार स्वागत केले.
- Advertisement -

