Wednesday, July 1, 2026
Homeनागपूरचक्क पोलिस विभागात कार्यरत कर्मचाऱ्याने पोलिस हवालदाराला दिले पकडुन; ३ हजाराची लाच...

चक्क पोलिस विभागात कार्यरत कर्मचाऱ्याने पोलिस हवालदाराला दिले पकडुन; ३ हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कर्तव्यावर असतांना झालेल्या अपघाताची नुकसान भरपाई मिळावी यासाठी दाखल गुन्ह्याच्या दोषारोपपत्राची प्रत देण्यासाठी ३ हजाराच्या लाचेची रक्कम मागणी करणाऱ्या एका पोलीस हवालदारास आज,बुधवार १ जुलै रोजी नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.विशेष म्हणजे, प्रकरणातील तक्रारदार हे पोलीस विभागात कार्यरत असून त्यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात
आहे; तर लाच स्वीकारणारा हा पोलीस विभागातील पोलीस हवालदार असल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे पोलीस विभागात कार्यरत असून ते कर्तव्यावर असतांना त्यांचा अपघात झाल्याने त्यांचे तक्रारीवरून नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात
गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा
तपास हा पोलीस स्टेशन गणेशपेठ येथील पोलीस हवालदार अतिष निकोडे वय ४७ वर्षे यांनी केलेला होता.तक्रारदार यांनी अपघातात नुकसान भरपाई मिळण्याकरिता न्यायालयात केस दाखल केली होती. त्याकरिता त्यांना अपघाताच्या गुन्ह्याच्या दोषारोपपत्राच्या(चार्जशीट)प्रतीची आवश्यकता होती. यासाठी नमूद गुन्ह्याच्या दोषारोपपत्राची प्रत मिळण्याकरिता तक्रारदार हे पोलीस हवालदार अतिष निकोडे यांना जावून भेटले असता पोलीस हवालदार  अतिष निकोडे यांनी तक्रारदार यांना ३ हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो नागपूर कार्यालयात तक्रार केली होती.सदर तक्रारीचे अनुषंगाने सापळा अधिकारी यांनी लाचेच्या मागणीबाबत पडताळणी कार्यवाही केली असता आज बुधवारी पडताळणी कार्यवाही दरम्यान तक्रारदार यांना चार्जशिटची प्रत देण्याकरिता ५ हजार रूपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता ३ हजार रूपये लाच रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यावरून,आरोपी पोलीस हवालदार अतिष निकोडे यांचेविरूध्द नागपूर शहराच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर,श्रीमती माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर,विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक महेश भोरटेकर सापळा पथक पोलीस निरीक्षक जितेंन्द्र वैरागडे,पोहवा आशिष वैद्य, विलीन तांबडे,पोशि होमेश्वर वाईलकर,प्रफुल भातुलकर,स्वाती हिंडोरिया चालक पोहवा राजेंन्द्र जांभुळकर यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून देशभर ‘विकसित भारत जी-राम-जी अधिनियम,२०२५’ लागू.. – आता शंभर दिवसांऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा 'विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन(ग्रामीण)अधिनियम,२०२५' (VB-G RAM G)आज,बुधवार १ जुलै २०२६ पासून देशभर...

आता विनापरवाना आयव्हीएफ केंद्रे चालवणे आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानांच्या गुन्ह्यांमध्ये होणार ‘मकोका’ अंतर्गत कारवाई.. – विधानसभेत ब्रम्हपुरीचाही मुद्दा गाजला..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विनापरवाना आयव्हीएफ केंद्रे चालवणे आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदानांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर 'मकोका' म्हणजेच 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' अंतर्गत कारवाई करण्याची...

मार्कंडादेव येथे जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी थेट संवाद.. – भूसंपादन,मंदिर संवर्धन,पूरनियोजन,आरोग्य सुविधा व रोजगार विकासाला गती देण्याचे यंत्रणांना निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मार्कंडादेव परिसरातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे संबंधित...

जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण २००१ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत खेळाडू(पुरुष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!