Sunday, August 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तहाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अश्यातच आता ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा आणला आहे.या नव्या फसवणुकीत तुम्ही जर कां हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर लगेच सावधगिरी बाळगा. कारण,फिंगरप्रिंट चोरीची नवी ‘एआय'(AI) पद्धत तुमच्या बँकेतील संपूर्ण आयुष्याची जमा-पुंजी रिकामी करू शकते.विशेष म्हणजे,हल्ली स्मार्टफोनवर सेल्फी काढणे आणि ती सोशल मीडियावर पोस्ट करणे ही एक फॅशन झाली आहे.फोटो काढतांना अनेकदा नकळतपणे हाताची दोन बोटे दाखवून ‘व्हिक्टरी’ किंवा ‘व्ही’ साइन देण्याची सवय अनेक लोकांना असते.मात्र, तुमची हीच सवय तुम्हाला आर्थिक संकटात फसवू शकते.सायबर गुन्हेगारांनी आता लोकांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स'(AI)चा वापर करून फिंगरप्रिंट चोरी करण्याची नवीन पद्धत शोधली आहे.सायबर तज्ज्ञांच्या मते,जर तुम्ही मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर बोटे दाखवून फोटो काढत असाल आणि तो फोटो हाय-क्वालिटी असेल,तर तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स धोक्यात येतात.जर फोटो सुमारे दीड मीटर अंतरावरून काढला असेल,तर चोरांना बोटांचे ठसे अगदी स्पष्टपणे मिळवता येतात.अगदी दीड ते तीन मीटर अंतरावरून काढलेल्या फोटोंमधूनही सायबर चोरटे सुमारे पन्नास टक्के फिंगरप्रिंट डेटा सहज गोळा करू शकतात आणि ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने या फिंगरप्रिंट्सची हुबेहूब नक्कल तयार केली जाते.आपण बँकेचा किंवा सोशल मीडियाचा पासवर्ड विसरलो तर तो रिसेट करता येतो.मात्र,आपले फिंगरप्रिंट्स बदलता येत नाहीत.हा बायोमेट्रिक डेटा एकदा चोरीला गेल्यास तुमची बँक खाती,डिजिटल पेमेंट सिस्टम(युपिआय) आणि वैयक्तिक ओळखीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे,सोशल मीडियावर फोटो शेअर करतांना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा मोठ्या फसवणुकीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!