Tuesday, July 14, 2026
Homeगडचिरोली'जागतिक तंबाखू विरोधी दिन' व 'उच्चरक्तदाब दिना' निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ आणि ‘जागतिक उच्चरक्तदाब दिना’चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार पडले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम(सामान्य रुग्णालय,गडचिरोली)आणि पोलीस विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरचा उपक्रम एम.रमेश(पोलीस अधीक्षक, गडचिरोली),गोकुल राज जी(अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन गडचिरोली)आणि डॉ.वर्षा लहाडे(जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय गडचिरोली) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.या शिबिरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मौखिक(तोंड)तपासणी, गटचर्चा तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांवर सविस्तर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.या चर्चासत्रात तब्बल १५० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
चर्चासत्राच्या सुरुवातीला स्वप्नील इज्जपवार [प्रभारी पोलीस उप अधीक्षक(गृह),गडचिरोली]यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून विशेषतः दूर राहावे,असे आवाहन केले.
डॉ.प्रेरणा राऊत(जिल्हा सल्लागार,NTCP)यांनी तंबाखूमुळे शरीरावर होणारे घातक परिणाम आणि विविध आजारांची माहिती दिली.खैरकर (चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ)यांनी व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या मानसिक दुष्परिणामांवर प्रकाश टाकला आणि व्यसनमुक्तीसाठी मानसिक सक्षमीकरण किती गरजेचे आहे हे पटवून दिले.
चर्चासत्रानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली,ज्यामध्ये तज्ज्ञ चमुने मोलाचे सहकार्य केले.प्रसंगी रीना मेश्राम (डेंटल हायजिनिस्ट) आणि खेमचंद वाढई यांनी कर्मचाऱ्यांची मौखिक तपासणी केली.तर तंबाखूचे व्यसन असलेल्या कर्मचाऱ्यांचे मीना दिवटे यांनी प्रभावी समुपदेशन (Counseling)केले.तसेच राहुल चावरे, वैशाली बोबाटे,शीतल काळबांधे आणि भूपेश दरडमारे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची उच्चरक्तदाब(बीपी)व मधुमेह (शुगर)तपासणी केली.सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नरेंद्र पिवाल [प्रभारी अधिकारी,पोलीस कल्याण शाखा]यांनी विशेष परिश्रम घेतले.पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!