Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या काही फीचर्स वापरासाठी मोजावे लागणार पैसे..

आता फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या काही फीचर्स वापरासाठी मोजावे लागणार पैसे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आजच्या डिजिटल युगात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.वैयक्तिक संवादापासून व्यवसाय,मार्केटिंग आणि मनोरंजनापर्यंत या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अश्यातच मेटाने आपल्या कमाईचे नवीन मार्ग शोधत ‘प्लस व्हर्जन’ किंवा ‘प्रीमियम सबस्क्रिप्शन’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ‘एक्स'(पूर्वीचे ट्विटर)प्लॅटफॉर्मने पेड सेवा सुरू केली होती. त्यानंतर,आता मेटानेही त्याच धर्तीवर फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसाठी सशुल्क सेवा आणण्याची तयारी सुरू केली आहे.त्यामुळे भारतीय युजर्ससह जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मेटाच्या या नवीन पेड सबस्क्रिप्शन प्लॅनअंतर्गत युजर्सना काही विशेष आणि प्रगत सुविधा दिल्या जाणार आहेत.या प्लॅनमध्ये अतिरिक्त कस्टमायझेशन फीचर्स,प्रीमियम टूल्स,अधिक नियंत्रण असलेले सेटिंग्ज पर्याय आणि काही एक्सक्लुझिव्ह सुविधा मिळू शकतात.कंपनीकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या प्रगत फीचर्सचा फायदा विशेषतः कंटेंट क्रिएटर्स,इन्फ्लुएन्सर्स,व्यवसायिक युजर्स आणि प्रोफेशनल वापरकर्त्यांना होणार असल्याचे मानले जात आहे.आतापर्यंत मोफत उपलब्ध असलेली काही फीचर्स भविष्यात केवळ पेड युजर्ससाठी मर्यादित केली जाऊ शकतात,अशीही चर्चा रंगू लागली आहे.
मेटाने जागतिक स्तरावर आपल्या प्रीमियम प्लॅन्सच्या संभाव्य किंमती जाहीर केल्या आहेत.इंस्टाग्राम प्लस आणि फेसबुक प्लससाठी सुमारे ३८७ रुपये प्रतिमहिना शुल्क आकारले जाऊ शकते.तर व्हॉट्सॲप प्लससाठी अंदाजे २९० रुपये प्रतिमहिना मोजावे लागू शकतात. मात्र,भारतातील युजर्ससाठी अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.त्यामुळे भारतीय बाजारपेठेनुसार या प्लॅन्सच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे.मेटाने स्पष्ट केले की,फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मोफत सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.सामान्य युजर्सना बेसिक फीचर्स वापरण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र,अधिक प्रगत फीचर्स आणि एक्सक्लुझिव्ह टूल्स वापरायचे असतील,तर युजर्सना प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!