Tuesday, July 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअनियंत्रित ट्रॅक्टर कालव्यात पलटी; तरुणाचा मृत्यू..

अनियंत्रित ट्रॅक्टर कालव्यात पलटी; तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतातील कामे आटोपून ट्रॅक्टरने घराकडे परत जात असतांना अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर थेट कालव्यात(मोठा नहर)पडून पलटी झाल्याने त्याखाली दबलेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार १७ मे रोजी पहाटे सुमारास हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील अकोली गाव नजीकच्या शेत शिवारात घडली.ज्ञानेश्वर उर्फ माऊली माधव कदम वय १८ वर्षे,रा.अकोली, ता.वसमत,जि.हिंगोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून घरातील एकुलता एक मुलगा दगावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरु असून ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जात आहे. उन्हामुळे काही काळ दिवसाच्या वेळी व रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जात आहे.दरम्यान,ज्ञानेश्वर हा ट्रॅक्टर घेऊन कामासाठी शेतात गेला होता.शेतातील कामे करून तो आज पहाटेच्या सुमारास घराकडे परत जात असतांना शेत शिवारातील कालव्याच्या रस्त्यावरून त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह कालव्यात पलटी झाला.यात ज्ञानेश्वर याच्या अंगावरच ट्रॅक्टरचे हेड पडल्यामुळे ती हेडखाली दबल्या गेला.त्याला बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.काही शेतकऱ्यांनी सदरचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ वसमत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय गजानन बोराटे,बिट अंमलदार विजयकुमार उपरे, आंबादास विभुते,नामदेव बेंगाळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर काढून त्याखाली दबलेला ज्ञानेश्वर याचा मृतदेह बाहेर काढला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अकोली गावात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!