Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीमलेरिया निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सज्ज; मलेरियाची लक्षणे आढळताच मोफत उपचार घेण्याचे आवाहन..

मलेरिया निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सज्ज; मलेरियाची लक्षणे आढळताच मोफत उपचार घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील मलेरिया प्रतिबंधात्मक मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नुकतीच महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत मलेरिया निदानातील अचूकता, उपचारांमधील अद्ययावत पद्धती आणि तांत्रिक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला.याप्रसंगी मार्गदर्शन करतांना एनव्हीबीडीसीपीचे संचालक डॉ.भुयान म्हणाले की, “मलेरिया मुक्त गडचिरोलीसाठी प्रत्येक रुग्णाची माहिती महत्त्वाची आहे.या मोहिमेत ‘पाथ’ (PATH)संस्थेमार्फत डेटा मॅनेजमेंटचे काम तांत्रिकदृष्ट्या केले जाणार असून, सर्व क्लिनिशियन्सनी त्यांच्या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.अचूक आकडेवारी आणि योग्य तांत्रिक दृष्टिकोन यामुळेच आपण मलेरियावर प्रभावी नियंत्रण मिळवू शकतो.”
प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी बैठकीत उपचारांच्या गुणवत्तेवर भाष्य केले.त्या म्हणाल्या, “जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मलेरिया उपचारांबाबत विशेष प्रशिक्षण घेतले जात आहे.विशेषतः गुंतागुंतीच्या(Complicated Malaria)रुग्णांसाठी ‘ल्युमेफँट्रिन’ (Lumefantrine) या औषधाची शिफारस करण्यात आली असून,मागील प्रकरणांचा पूर्वलक्षी अभ्यास (Retrospective Case Study)करून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला जात आहे.प्रत्येक गंभीर रुग्णाचे ‘केस ऑडिट’ काटेकोरपणे करण्याच्या सूचनाही सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे👇
प्रशिक्षण : जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे (MO)मलेरिया उपचारांबाबत सक्षमीकरण करणे.
पाथ(PATH)संस्थेची भूमिका : क्लिनिशियन्सना तांत्रिक प्रशिक्षण देणे आणि संपूर्ण मोहिमेच्या डेटाचे व्यवस्थापन करणे.
केस ऑडिट :उपचारांची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रत्येक मलेरिया केसचे सखोल ऑडिट करणे.
औषधोपचार : गुंतागुंतीच्या रुग्णांसाठी आधुनिक औषधोपचारांचा वापर आणि त्याचा लेखी अभ्यास अहवाल तयार करणे.
या बैठकीला आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.नागरिकांनी मलेरियाची लक्षणे आढळताच घाबरून न जाता शासकीय रुग्णालयात मोफत उपचार घ्यावेत,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!