Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीयुवक,युवती व संस्थांनी जिल्हास्तरीय युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.. - पहा...

युवक,युवती व संस्थांनी जिल्हास्तरीय युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.. – पहा पात्रतेचे निकष व पुरस्कारासाठी मुल्यांकन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये १२ नोव्हेंबर,२०१३ च्या शासन निर्णयानुसार,जिल्ह्यातील युवक,युवती व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवांना विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रती वर्षी देण्यात येत असतो.सदर पुरस्कार जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो.त्याअनुषंगाने सदर पुरस्काराकरीता कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धिद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहे.तरी खालीलप्रमाणे मुल्यांकनासह व पात्रतेचे निकष पुर्ण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील युवक,युवती व संस्थांनी या कार्यालयातुन अर्ज प्राप्त करुन घेऊन, आवश्यक कागदपत्र व शासन निर्णयानुसार पात्रतेच्या निकषाचे पुरावे व मुल्यांकनाच्या पुराव्याचे संपूर्ण कागदपत्रासह तसेच युवक-युवतीचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र व संस्थेसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्यांनी सर्व सदस्यांचे पोलीस चारित्र्य प्रमाणपत्रासह आपला परिपुर्ण प्रस्ताव विहीत नमुण्यात येत्या,१ जून २०२६ पर्यंत दोन प्रतीत बंद लिफाफ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल,कॉम्प्लेक्स,गडचिरोली येथे सादर करावा.तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १२ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे.अधिक माहिती करीता कार्यालयीन वेळेत कार्यालयाशी संपर्क साधावा व जिल्ह्यातील अधिकाधिक युवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवक,युवती व संस्था यांनी प्रस्ताव सादर करावे,असे आवाहन भास्कर घटाळे,जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.
  • युवक व युवतींसाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे👇
अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्ष पुर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्षापर्यंत असावे.(तसा पूरावा जोडावा).जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग पाच वर्ष वास्तव्य असावे.(दाखला जोडावा).पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागुन दिला जाणार नाही.पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही.केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडाणे आवश्यक राहील.(उदा. वृत्तपत्रीय कात्रणे,प्रशस्तीपत्रे,चित्रफिती व फोटो, इत्यादी).अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. (तसे हमीपत्र जोडावे).एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. (तसे हमीपत्र जोडावे).केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.(तसे हमीपत्र जोडावे).अर्जदाराने पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला(संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन)देणे आवश्यक राहील.
  • संस्थांसाठी पात्रता निकष👇
पुरस्कार संस्थेस विभागुन दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोणे आवश्यक राहील.(अदा.वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे,चित्रफिती व फोटो,इत्यादी).अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील.अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार पंजीबद्ध असावी.अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे.अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे.(तसेच हमीपत्र जोडावे).एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.(तसे हमीपत्र जोडावे).अर्जदार व संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणीत केलेला चारित्र्य दाखला(संबंधीत परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन)देणे आवश्यक राहील.
  • पुरस्कारासाठी मुल्यांकन👇
युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य १ एप्रिल ते ३१ मार्च (०१/०४/२०२२ ते ३१/०३/२०२३,०१/०४/२०२३ ते ३१/०३/२०२४, ०१/०४/२०२४ ते ३१/०३/२०२५ पर्यंत)या कालावधीत गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल.युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य.राज्यात साधन संपत्ती जतन व संवर्धनत तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य.समाजातील दुर्बल घटक,अनुसुचित जाती,जमाती व जनजाती आदिवासी भाग,इ.बाबतचे कार्य.शिक्षण,प्रौढशिक्षण,रोजगार, आरोग्य,पर्यावरण,सांस्कृतीक,कला,क्रीडा,मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान,व्यवसाय,महिला सक्षमीकरण,स्त्री भ्रूण,व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य.नागरी गलीच्छवस्ती सुधारणा,झोपडपट्टी,आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या,महिला सक्षमीकरण व साहस इत्यादी बाबतचे कार्य.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!