Wednesday, July 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनशिबाचा खेळ..! कालपर्यंत दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करणारी आता लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत...

नशिबाचा खेळ..! कालपर्यंत दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करणारी आता लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत ठेवणार पाऊल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नशिबाचा खेळ हा न्याराच म्हणावा लागेल.पण,नशीब फडफडायला त्याप्रमाणे कार्यही करणे तितकेच महत्वाचे आहे.नाहीतर ‘दे गा हरी अन् पलंगावरी’ असे केल्याने होत नाही,तर ‘केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे’ या म्हणीप्रमाणे कालपर्यंत उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या घरी जाऊन झाडू मारणे, फरशी पुसणे आणि धुणी-भांडी करणाऱ्या कल्पिता माझी आता लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत.काल सोमवारी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.त्यात कल्पिता माझी ह्या १२ हजार ५३५ मतांनी विजयी झाल्या.कल्पिता यांच्या पारड्यात तब्बल १ लाख ७ हजार ६९२ मते पडली.पश्चिम बंगालच्या औशग्राम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांनी मिळवलेला विजय हा केवळ एका जागेचा विजय नसून, संघर्षाचा विजय मानला जात आहे.विशेष म्हणजे, घराणेशाही आणि धनशक्तीच्या जोरावर चालणाऱ्या राजकारणाला पश्चिम बंगालमध्ये एका सामान्य महिलेने जोरदार चपराक दिली आहे.
पश्चिम बंगालच्या गुस्करा नगरपालिकेतील एका छोट्या घरात राहणाऱ्या कल्पिता माझी या चार घरांची कामे करून महिन्याला अवघे अडीच हजार रुपये कमवत होत्या.त्यांचे पती ड्राय क्लीनर म्हणून काम करतात. गरिबीचा डोंगर समोर असतांनाही कल्पिता यांनी कधीही हार मानली नाही.२०२१ च्या निवडणुकीतील पराभवानंतरही त्या खचल्या नाहीत.उलट त्यांनी आपला जनसंपर्क अधिक वाढवला.२०२१ मध्ये पहिल्या प्रयत्नात पराभव पत्करावा लागला,मात्र कामात खंड पडू दिला नाही.यावेळी भाजपने पुन्हा विश्वास दाखवल्यावर कल्पिता माझी यांनी प्रतिस्पर्धी श्यामा प्रसन्ना लोहार यांचा १२ हजार ५३५ मतांनी पराभव केला.कोणताही गाजावाजा किंवा मोठ्या गाड्यांचा ताफा न करता कल्पिता माझी अतिशय साध्या वेशात घरोघरी फिरल्या. “मी तुमच्यातीलच एक आहे,” हा त्यांचा साधेपणा मतदारांच्या मनाला भिडला आणि जिद्द घेऊन मैदानात उतरलेल्या एका कष्टकरी महिलेने आज आमदारकीचा मोहोर उमटवत देशासमोर एक नवा आदर्श ठेवला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; शिक्षकांच्या प्रश्नांकडे वेधणार लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकांचे राज्य स्तरावर प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना,शिक्षक संघटना समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,...

‘पावसाळा आला आरोग्य सांभाळा..!’ ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला,डेंग्यू,मलेरिया,टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो.नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,यासाठी सार्वजनिक...

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!